Sanjay Gandhi Niradhar: संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरजू आणि वंचित घटकांना सामाजिक सुरक्षा व आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. विधवा, निराधार पुरुष-महिला, एकल महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ऑनलाईन अर्ज: अर्जदाराला ‘आपले सरकार’ या शासकीय ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज भरावा लागतो.
कागदपत्रे सादर करणे: ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंटेड प्रत गावामध्ये तलाठ्याकडे किंवा तहसील कार्यालयात सादर करावी लागते.
छाननी आणि मंजुरी: सादर केलेल्या अर्जांची छाननी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाते. या समितीच्या मंजुरीनंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होते.