2020 पीक विमा सरसगट बँक खात्यावर जमा; तुम्हाला पैसे आले का? येथे पहा आपले नाव. crop insurance 2020

crop insurance 2020 : सन २०२० मधील खरीप हंगामातील पीक विम्याच्या (Kharip Peak Vima 2020) प्रलंबित भरपाईसाठी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला आहे. या महत्त्वपूर्ण विजयामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी तब्बल २२० कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता भरपाई वाटपाचा मार्ग सुकर झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने (Chhatrapati Sambhajinagar High Court) खासगी पीक विमा कंपनी, बजाज अलायन्स (Bajaj Allianz), विरोधात निकाल देत शेतकऱ्यांच्या हक्कावर शिक्कामोर्तब केला आहे.

अतिवृष्टीनंतर विमा कंपनीची टाळाटाळ crop insurance 2020

२०२० च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) सोयाबीनचे काढणीपश्चात मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा असताना, बजाज अलायन्स या विमा कंपनीने तांत्रिक कारणे देत शेतकऱ्यांना भरपाई देण्यास साफ नकार दिला.

Leave a Comment