ration card update सार्वजनिक वितरण प्रणाली (Public Distribution System) अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि रेशन कार्डधारकांना त्यांच्या हक्काची माहिती त्वरित मिळावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान सुरू केले आहे. आता रेशन कार्डधारकांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे धान्याचा संपूर्ण हिशेब मिळण्यास सुरुवात झाली आहे.
पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सुविधा सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या धान्य वाटपासंदर्भात अनेक लाभार्थ्यांना यासंबंधीचे एसएमएस प्राप्त झाले आहेत.
धान्याचा कोटा स्पष्ट: मेसेजमध्ये लाभार्थ्यांना मिळालेल्या धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद केला जातो.
धान्याचे प्रकार: गहू, तांदूळ, ज्वारी यांसारख्या प्रत्येक धान्याचा किती किलो वाटा मिळाला आहे, याची माहिती दिली जाते.
निशुल्क धान्य: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत (NFSA) हा संपूर्ण कोटा भारत सरकारकडून पूर्णपणे निःशुल्क दिला जात असल्याची माहिती मेसेजमध्ये नमूद असते.
पावती बंधनकारक: धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडून पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट केले आहे.
यामुळे रेशनचा व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास आणि गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
अनेकदा रेशन दुकानांमध्ये धान्यामध्ये काटछाट होते किंवा कमी धान्य दिले जाते. ही समस्या दूर करण्यासाठी आणि ग्राहकांना थेट तक्रार करता यावी यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
‘मेरा रेशन’ ॲप: जर काही तांत्रिक कारणांमुळे एसएमएस प्राप्त झाला नाही, तर ‘मेरा रेशन’ या ॲपचा वापर करता येतो. या ॲपवर आधार क्रमांक वापरून धान्याचा मंजूर आणि प्रत्यक्ष मिळालेला कोटा तपासता येतो, ज्यामुळे गैरप्रकार ओळखणे सोपे होते.
मोबाईल नंबर लिंक करणे: मोबाईलवर एसएमएस मिळवण्यासाठी रेशन कार्डशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडलेला असणे अनिवार्य आहे. मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर पुढील महिन्यापासून किती आणि कोणते धान्य मिळणार आहे, याची माहिती तुम्हाला मिळत राहील.
चुकीच्या एसएमएसबाबत काळजी घ्या
सध्या प्रणालीच्या अपडेशनचे काम सुरू असल्यामुळे काही ग्राहकांना चुकीचे एसएमएस येण्याच्या तक्रारी आल्या आहेत.
ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी सांगितले की, “ग्राहकांना माहिती मिळाल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. तरीही, प्रणालीच्या अपडेशनमुळे काही ग्राहकांना चुकीचे एसएमएस येत आहेत. चुकीचा मेसेज आल्यास पुरवठा विभाग किंवा रेशन दुकानदारांशी संपर्क साधावा.”