Roof Top Solar Scheme : महाराष्ट्र शासनाने सामान्य वीज ग्राहकांना मोठी दिलासा देणारी ‘स्मार्ट’ (SMART) रूफटॉप सोलर योजना आणली आहे. या योजनेमुळे आता फक्त ₹२,५०० इतकी नाममात्र रक्कम भरून सामान्य नागरिक आणि दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवणे शक्य होणार आहे.
केंद्र शासनाच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या धर्तीवर, राज्य शासनाने आणलेल्या या ‘स्मार्ट’ उपक्रमामुळे ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. वीज वापराचा खर्च कमी करणे आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
‘स्मार्ट’ सोलर योजनेतील महत्त्वाचे फायदे
या योजनेत पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदानाची मर्यादा खूप मोठी आहे, ज्यामुळे सोलर सिस्टीम बसवण्याचा खर्च अगदी कमी होतो.
- नाममात्र गुंतवणूक: पात्र लाभार्थी केवळ ₹२,५०० भरून सोलर सिस्टीमचा लाभ घेऊ शकतात.
- अनुदान मर्यादा: या योजनेत लाभार्थ्यांच्या वर्गवारीनुसार ८०%, ९०% आणि ९५% पर्यंत भरघोस अनुदान दिले जाते.
- प्रवर्गानुसार लाभ: ओपन आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील लाभार्थ्यांनाही ८०% पर्यंत अनुदान मिळू शकते.
Roof Top Solar Scheme योजनेसाठी पात्रता निकष (Eligibility)
‘स्मार्ट’ रूफटॉप सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- वीज वापर: अर्ज करणाऱ्या वीज ग्राहकाचा मासिक वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असावा.
- वर्गवारी: दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबे आणि कमी वीज वापर असलेले ग्राहक या योजनेसाठी विशेष पात्र आहेत.
रूफटॉप सोलरसाठी अर्ज करण्याची सुलभ प्रक्रिया
राज्य शासनाने रूफटॉप सोलरसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. आता केंद्रीय पोर्टल (PM सूर्य घर योजना पोर्टल) आणि राज्य शासनाचे ‘i-SMART’ पोर्टल या दोन्ही प्रणालींचे एकत्रीकरण (Integration) करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका पोर्टलवर अर्ज करू शकता.
महावितरण (Mahadiscom) पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची ‘स्टेप-बाय-स्टेप’ प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
पोर्टल भेट व ग्राहक क्रमांक नोंदणी
- महावितरणच्या (Mahadiscom) अधिकृत वेबसाइटवर जा.
- होम पेजवर ‘रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा’ (Apply for Rooftop Solar) या लिंकवर क्लिक करा. येथे ‘PM सूर्य घर योजनेची’ माहिती देखील मिळेल.
- ‘अप्लाय’ (Apply) बटणावर क्लिक करून तुमचा ग्राहक क्रमांक (Consumer Number) काळजीपूर्वक टाका.
मोबाईल ओटीपी पडताळणी
- ग्राहक क्रमांक टाकून ‘शोधा’ (Search) वर क्लिक केल्यानंतर, तुमच्या वीज बिलाशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
- हा ओटीपी टाकून तुमचा अर्ज सत्यापित (Verify) करा.
माहिती पडताळणी आणि आधार लिंकिंग
- तुमचा ग्राहक क्रमांक, नाव, पत्ता आणि बिलिंग युनिटसारखी माहिती आपोआप (Automatically) घेतली जाईल.
- यामध्ये पर्यायी लँडमार्क आणि जिल्ह्याचे नाव नमूद करा.
- आधार माहिती घेण्यासाठी संमती (Consent) देऊन तुमचा आधार क्रमांक टाका.
- आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून आधार सत्यापित करा.
टीप: सोलर सिस्टीम बसवण्यासाठी अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे (उदा. वीज बिल, आधार कार्ड, बँक पासबुक) तयार ठेवावी लागतील.
या योजनेचा लाभ घेऊन केवळ ₹२,५०० च्या गुंतवणुकीत मोठा वीज खर्च वाचवा आणि हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन द्या.