wheat sowing : साधारणपणे, गव्हाच्या पेरणीची योग्य वेळ ३० नोव्हेंबरपर्यंत मानली जाते. परंतु, यावर्षी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत, ज्या शेतकऱ्यांना अजून गहू पेरायचा आहे, त्यांच्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत उशिरा पेरणी करण्याची शिफारस केली जाते.
गहू अभ्यासक गजानन जाधव यांनी उशिरा पेरणी करताना उत्पादन घटू नये यासाठी काही महत्त्वपूर्ण आणि सुधारित तंत्रज्ञान सांगितले आहे, जे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, पेरणीस जेवढा उशीर होईल, तेवढी उत्पादनात घट येते. गजानन जाधव यांच्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरनंतर पेरणीच्या प्रत्येक पंधरवड्यात उत्पादनामध्ये प्रति एकर अडीच क्विंटलने घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे, १५ डिसेंबरनंतर गहू पेरण्याऐवजी दुसरे पर्यायी पीक निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
गव्हासाठी पाण्याचे योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गव्हाच्या खालील संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी देणे अनिवार्य असते:
तण नियंत्रण (Broad Leaf Weeds): रुंद पानांच्या तणांवर जमिनीत ओलावा असताना ‘अलग्रीप’ (८ ग्रॅम प्रति एकर) या तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर २०-२५ दिवसांच्या आत करणे प्रभावी ठरते.
कीड नियंत्रण: पोंगेमर (मावा) आणि खोडअळीवर ‘रेज’ हे कीटकनाशक उपयुक्त आहे.
या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उशिरा पेरणी केलेले शेतकरी देखील गव्हाचे चांगले उत्पादन घेऊ शकतात.